
वॉशिंग्टन , 08 मार्च (हिं.स.)।मध्य- पूर्वमध्ये सध्या युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ब्रिटनलाही इशारा देण्यास सुरुवात केली आहे.ट्रम्प यांनी ब्रिटनला आपला खूप जुना आणि चांगला सहयोगी म्हटले, मात्र अलीकडे ब्रिटनकडून मध्य- पूर्वमध्ये दोन विमानवाहू युद्धनौका पाठवण्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली असून ट्रुथ सोशलवर स्टार्मर यांना थेट इशारा दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “युनायटेड किंगडम, जो कधीकाळी आमचा चांगला सहयोगी होता—कदाचित सर्वांत महान—तो आता मध्य- पूर्वमध्ये दोन विमानवाहू नौका पाठवण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. काही हरकत नाही, पंतप्रधान स्टार्मर, आता आम्हाला त्यांची गरज नाही—पण आम्ही हे लक्षात ठेवू. युद्ध जिंकल्यानंतर त्यात सहभागी होणाऱ्यांची आम्हाला गरज नाही!”या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी ब्रिटनकडून दोन विमानवाहू नौका पाठवण्याचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, अलीकडे मध्य- पूर्वमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सायप्रस येथेही ब्रिटनच्या काही लष्करी तळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सांगितले की सायप्रसमधील ब्रिटिश तळावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर ब्रिटन तेथे एक युद्धनौका आणि हेलिकॉप्टर पाठवत आहे.
स्टार्मर यांनी असेही सांगितले की त्यांनी सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांना कळवले आहे की ब्रिटन ड्रोनविरोधी क्षमता असलेली हेलिकॉप्टर आणि युद्धनौका एचएमएस ड्रॅगन या भागात तैनात करत आहे. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयावरून स्टार्मर यांना इशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode