नेपाळच्या संसदीय निवडणुकीत १४ महिला विजयी, आरएसपीने मिळवल्या १३ जागा
काठमांडू, 09 मार्च (हिं.स.)। नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत 14 महिलांची संसदेसाठी निवड झाली आहे. हे एकूण जागांपैकी सुमारे 8 टक्क्यांहून थोडे अधिक आहे. यापैकी 13 जागांवर राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (आरएसपी) ने विजय मिळवला असून, एक जागा
नेपाळच्या संसदीय निवडणुकीत १४ महिला विजयी, आरएसपीने मिळवल्या १३ जागा


काठमांडू, 09 मार्च (हिं.स.)। नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत 14 महिलांची संसदेसाठी निवड झाली आहे. हे एकूण जागांपैकी सुमारे 8 टक्क्यांहून थोडे अधिक आहे. यापैकी 13 जागांवर राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (आरएसपी) ने विजय मिळवला असून, एक जागा नेपाळी काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. मागील निवडणुकांच्या तुलनेत हा आकडा अधिक चांगला मानला जात आहे. 2022 च्या निवडणुकीत केवळ 9 महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या, जे एकूण जागांच्या सुमारे 5.45 टक्के होते.

नेपाळच्या संविधानानुसार संसदेत महिलांना किमान 33 टक्के प्रतिनिधित्व मिळणे अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत राजकीय पक्षांना हा उद्देश पूर्ण करता आलेला नाही. प्रत्यक्ष मतदान प्रणालीत यावेळी 14 महिलांच्या विजयामुळे त्यांचे प्रतिनिधित्व सुमारे 8.48 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.नेपाळच्या प्रतिनिधी सभेत एकूण 275 जागा आहेत. यापैकी 165 सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातात, तर 110 सदस्य प्रमाण प्रतिनिधित्व (प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन) प्रणालीद्वारे संसदेत येतात.

यंदाच्या निवडणुकीत अनेक महिला उमेदवारांनी मोठ्या नेत्यांना पराभूत करून विजय मिळवला. इंदिरा रनमागर यांनी मोठा विजय मिळवत सीपीएन-यूएमएलचे नेते आणि विसर्जित प्रतिनिधी सभेचे माजी सभापती देव राज घिमिरे यांचा 48,742 मतांनी पराभव केला. रनमागर यांना 60,110 मते मिळाली, तर घिमिरे यांना 11,368 मते मिळाली.त्याचप्रमाणे रुबिना आचार्य यांनी नेपाळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शेखर कोईराला यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. आचार्य यांना 55,513 मते मिळाली, तर कोईराला यांना 12,850 मते मिळाली.

आणखी एका महत्त्वाच्या लढतीत सोबिता गौतम यांनी नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांच्या कन्या रेणु दहल यांचा पराभव केला. गौतम यांना 59,277 मते मिळाली, तर भरतपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवणाऱ्या रेणु दहल यांना 20,615 मते मिळाली. या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या इतर महिलांमध्ये निशा डांगी, आशा झा, पुष्पा कुमारी चौधरी, गौरी कुमारी, नीतिमा भंडारी, आशिका तामांग, रंजू न्यूपाने, तोशिमा कार्की, बीना गुरूंग आणि कोमल ग्यावली यांचा समावेश आहे. याशिवाय 45 वर्षीय वासना थापा या नेपाळी काँग्रेसकडून विजयी होणाऱ्या एकमेव महिला उमेदवार ठरल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande