बाळे येथे समाधान शिबिर; नागरिकांना एकाच ठिकाणी २२ शासकीय सेवा
सोलापूर, ११ एप्रिल (हिं.स.) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ अंतर्गत बाळे येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. य
rhed


सोलापूर, ११ एप्रिल (हिं.स.) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ अंतर्गत बाळे येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील होते. यावेळी नायब तहसीलदार सुधाकर बंडगर, गटविकास अधिकारी राजाराम भोंग, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, अलका भवर, बिजू प्रधाने, समाधान आवळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यात प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, सातबारा उताऱ्यांतील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त उतारे वाटप यासह नॉन-क्रीमिलिअर, उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्रे देण्याची सुविधा पुरविण्यात आली. याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजना आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखल्यांचीही सेवा देण्यात आली.या शिबिरात एकूण सुमारे २२ विविध शासकीय योजनांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांना विविध सेवा सहज आणि जलद मिळाल्या.

----------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande