राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली, 14 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे
नवी दिल्ली


नवी दिल्ली, 14 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विशेष आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल यांनी पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर, नवीन महाराष्ट्र सदनातील प्रांगणात बसवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे आणि सहायक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महामानवाच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक जीवनकार्याचा आणि त्यांनी दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचा सर्वांना परिचय करून दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande