धुळ्यात गावठी पिस्तूल खरेदी विक्रीप्रकरणी दोघांना अटक
धुळे, 15 एप्रिल (हिं.स.) शिरपूरसह परिसरात शस्त्रांची बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री रोखण्यासाठी शिरपूर शहर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसांसह दोघा संशयितांना अटक केली. शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना
अटक लोगो


धुळे, 15 एप्रिल (हिं.स.) शिरपूरसह परिसरात शस्त्रांची बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री रोखण्यासाठी शिरपूर शहर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसांसह दोघा संशयितांना अटक केली. शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना दोन जण गावठी पिस्तुलची खरेदी-विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक परदेशी यांनी उपनिरीक्षक संदिप दरवडे व त्यांच्या पथकाला आदेश देत सापळा रचला व पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पवन दादा कोतवाल (वय १९, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे), अक्षय संदिप पाटील (वय २१, रा. भटाणे, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी दोघांची नावे आहेत. पवन कोतवाल जवळ एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक संदिप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली डी. बी. पथकातील हवालदार रविंद्र आखडमल, अतुल पाटील, आरीफ तडवी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, विनोद आखडमल, सचिन वाघ, भटू साळुंके, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी, रविंद्र महाले, विजय पाटील यांनी कारवाई कामगिरी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande