
बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या १९ वर्षीय तरुणाने माजलगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलीस अधीक्षकांनी त्याला जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश दिले होते, मात्र आदेशाचे उल्लंघन करून तो माजलगावमध्येच वास्तव्य करत होता. त्याने घरातील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावून आपले जीवन संपवले. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माजलगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूसह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी गणेश नांगरे यांच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis