अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; नराधम पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव, 15 एप्रिल, (हिं.स.) - महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नसून याच दरम्यान, जळगावमधून नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आलीय. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १६ वर्षीय मुलीवर तिच्या ३४ वर्ष
अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; नराधम पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव, 15 एप्रिल, (हिं.स.) - महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नसून याच दरम्यान, जळगावमधून नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आलीय. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १६ वर्षीय मुलीवर तिच्या ३४ वर्षीय मावसाने वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नराधम मावसाविरुद्ध पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.

सन २०२५ मधील दिवाळी सणाच्या सुमारे १५ दिवस अगोदर ही १६ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना तिच्या मावसाने घरी येऊन तिच्यावर जबरदस्ती केली. या पहिल्या कृत्यानंतर नराधमाने मुलीला “कोणालाही काही सांगितले तर जीवे ठार मारीन” अशी धमकी देऊन तिची वाचा बंद केली. याच भीतीचा फायदा घेत त्याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. तेथून तालुका पोलिस ठाण्यात मााहिती देण्यात आली व पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी मुलीचा जबाब घेतला असता, मावसाने अत्याचार केल्याचे सांगितले. मुलीच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या मावसाविरुद्ध पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande