
नवी दिल्ली, 17 एप्रिल (हिं.स.) : इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात जाहीर झालेल्या युद्धविरामाचे भारताने स्वागत करत, हा पाऊल प्रदेशात शांततेसाठी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. भारत युद्धविरामाचे स्वागत करतो आणि शांततेकडे नेणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना आमचा पाठिंबा असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल शुक्रवारी आयोजित साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गुरुवारी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर भारताने यावर प्रतिक्रिया दिली आहे. या उपक्रमाचा उद्देश इराणशी संबंधित आणखी एका आघाडीवरील तणाव तात्पुरता कमी करणे असा मानला जात आहे.लेबनॉन औपचारिकरित्या इस्रायलविरुद्धच्या युद्धात सहभागी नसला तरी दक्षिण लेबनॉनमधील मोठ्या भागांवर हिझबुल्लाहचा प्रभाव आहे. या संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इस्रायलनेही लष्करी कारवाई केली असून त्याचा फटका लेबनॉनला बसला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान इस्रायलने भारताला हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या विनंतीबाबत विचारले असता, आमच्याकडे एक निश्चित प्रक्रिया आहे आणि अशा विषयांवर त्याच प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जातो असे जयसवाल यांनी सांगितले.
दरम्यान, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी अलीकडेच जगभरातील प्रमुख हिंदू नेत्यांसोबतच्या चर्चेदरम्यान भारताने हमासला दहशतवादी संघटना घोषित करावे, असे आवाहन केले. त्यांनी म्हटले की हमासचे संबंध लष्कर-ए-तैयबा सारख्या इतर कट्टरपंथी संघटनांशी आहेत.गिदोन सार यांनी भारत-इस्रायल संबंधांतील सकारात्मक प्रगतीचेही कौतुक केले आणि या द्विपक्षीय नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की इस्रायल मागील काही वर्षांपासून कट्टरपंथी इस्लामी संघटनांविरुद्ध व्यापक मोहीम राबवत आहे.तसेच त्यांनी असा दावा केला की या संघटनांचे घोषित उद्दिष्ट इस्रायलचा अस्तित्व संपवणे आहे. मात्र, इस्रायलने विविध आघाड्यांवर आपली लष्करी ताकद सिद्ध केली असून या संघर्षाचे परिणाम मध्यपूर्वेबाहेरही दिसू शकतात.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी