नाशिक प्रकरण: निदा खानच्या पतीची पोलिसांकडून चौकशी, निदा फरारच
नाशिक, 17 एप्रिल (हिं.स.) : नाशिक शहरातील टाटा कन्स्टंन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील लैंगिक छळ व धर्मांतरण प्रकरणात पोलीस तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. टीसीएसची फरार एचआर निदा खान हिचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी
नाशिक प्रकरण: निदा खानच्या पतीची पोलिसांकडून चौकशी, निदा फरारच


नाशिक, 17 एप्रिल (हिं.स.) : नाशिक शहरातील टाटा कन्स्टंन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील लैंगिक छळ व धर्मांतरण प्रकरणात पोलीस तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. टीसीएसची फरार एचआर निदा खान हिचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत सुरू असून पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे जाऊन निदाच्या पतीची चौकशी केल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारींचा समावेश असल्याने आतापर्यंत 9 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

तपासादरम्यान पोलिसांचे एक पथक मुंबईतील मुंब्रा परिसरात पोहोचले होते. येथे आरोपी निदा खान हिच्या पतीची चौकशी करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनंतर पथकाने संबंधित ठिकाणी शोध घेतला असता, ती नातेवाईकांकडे गेल्याचे समोर आले. मात्र त्या ठिकाणी पोहोचल्यावर घर बंद आढळले, तसेच आरोपी व तिच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन बंद असल्याचेही निदर्शनास आले.

दरम्यान, चौकशीदरम्यान निदा टीसीएसमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम करत नसल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर काही अप्रमाणित व तर्काधारित माहिती प्रसारित होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, नागरिकांनी अशा माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच ती पुढे प्रसारित करू नये, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे. तपास सुरू असून पुढील कारवाई सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande