सोलापूर - योगिनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन सभागृहाचे जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)। योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर यांच्या योगीनाथ सभागृह या नुतन वास्तूचे उदघाटन सोहळा शनिवारी 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था हिबारे नगर, शेळगी येथे संपन्न होणार आहे.
सोलापूर - योगिनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन सभागृहाचे जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन


सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।

योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर यांच्या योगीनाथ सभागृह या नुतन वास्तूचे उदघाटन सोहळा शनिवारी 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था हिबारे नगर, शेळगी येथे संपन्न होणार आहे. 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा परंपरेत योगीनाथ पतसंस्थेने अनेकांच्या जीवनाला 'गती' आणि गतीतून सुख-समृध्दी दिली. असंख्य सभासद ग्राहकांची सेवापूर्ती करण्यासाठी योगीनाथ पतसंस्थेने स्वतःचे सभागृह सर्वांच्या स्वागतासाठी आणि परिपूर्ण सेवेसाठी रुजू करत आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ष.ब्र.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, माजी खासदार सोलापूर तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

या कार्यक्रमास अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, बाजार समिती सभापती दिलीप माने, शहर अध्यक्ष सौ. रोहिणीताई तडवळकर, किरण गायकवाड जिल्हा उपनिबंधक, सोलापूर, सौ. प्रगती बागल मॅडम शहर उपनिबंधक, सोलापूर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्षदिलीपजी पतंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाट्न सोहळा पार पडणार आहे. अशी माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande