राष्ट्रव्यापी निषेध आंदोलनामार्फत विश्व हिंदू परिषदेचा इशारा; नाशिकमध्ये जोरदार मोर्चा
नाशिक, 17 एप्रिल, (हिं.स.)। धर्मांतराविरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलतर्फे राष्ट्रव्यापी निषेध आंदोलन करण्यात येत असून धर्मांध जिहादी वृत्तीचा नाश करण्यासाठी दशावतार घेऊ, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. नाशिकमध्ये मोर्चाद्वारे जाऊन जिल्हाधिकाऱ्य
Vishwa Hindu Parishad


Vishwa Hindu Parishad


नाशिक, 17 एप्रिल, (हिं.स.)। धर्मांतराविरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलतर्फे राष्ट्रव्यापी निषेध आंदोलन करण्यात येत असून धर्मांध जिहादी वृत्तीचा नाश करण्यासाठी दशावतार घेऊ, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. नाशिकमध्ये मोर्चाद्वारे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना या आशयाचे निवेदन देण्यात आले.

जाणूनबुजून धर्मांध जिहादींकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून होत असलेल्या धर्मांतरणाच्या निषेधार्थ बजरंग दलतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

देशातील अनेक शहरांत सुरू असलेल्या जिहादी मुस्लिमांकडून होत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद यात आता नवीन ‘कॉर्पोरेट जिहाद’ सुरू झाला असून, यात हिंदू समाजातील सुशिक्षित युवती तसेच युवकांना टार्गेट करून त्यांच्यावर धर्मांतर करण्याची सक्ती व शारीरिक शोषण करून धर्मांतरणाचे षड्यंत्र रचले जात आहे. या विरोधात बजरंग दल नेहमीच सजग असून हिंदू समाजासोबत असेल, अशी ग्वाही आंदोलनादरम्यान देण्यात आली. आंदोलनावेळी बजरंगी व हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande