
नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.)। लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकारितामंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी भगवान परशुराम जन्मोत्सव आणि अक्षय तृतीया या पवित्र सणानिमित्त आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
ओम बिरला यांनी एक्सवर म्हटले, “भगवान परशुराम जन्मोत्सव आणि अक्षय तृतीया या पवित्र सणानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! चला, या पवित्र प्रसंगी आपण भगवान परशुरामांच्या आदर्शांना आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा संकल्प करूया आणि न्यायपूर्ण, सशक्त व मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीत आपला वाटा उचलूया. भगवान श्री हरि यांच्याकडे प्रार्थना आहे की अक्षय तृतीया हा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि नवी ऊर्जा घेऊन येवो तसेच प्रत्येक घरात आनंद आणि सकारात्मकतेचा संचार होवो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भगवान परशुरामांकडून आपल्याला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहण्याची प्रेरणा मिळते. त्यांचे आशीर्वाद सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश पसरवोत. अक्षय तृतीया हा सण आपल्याला सत्कर्म, दान आणि सेवाभावाच्या मार्गावर पुढे जाण्यास प्रेरणा देतो. हा सण प्रत्येकाच्या जीवनात सुख, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. सर्वांना अक्षय फळाची प्राप्ती होवो, हीच कामना आहे.
अमित शाह यांनी म्हटले की, धर्मरक्षण आणि न्यायप्रियतेचे प्रतीक भगवान परशुराम यांच्याकडे देशवासियांच्या कल्याणाची प्रार्थना करतो. केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख-शांती, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, ते आपल्या साठी ज्ञान आणि पराक्रमाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कृपेने आपले जीवन धैर्य, विद्या आणि विवेकाने परिपूर्ण होवो, अशी माझी इच्छा आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, आमची प्रार्थना आहे की आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, न्याय आणि धर्माची मूर्ती भगवान श्री परशुराम यांची कृपा आणि आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, सर्वांचे मंगल आणि कल्याण होवो, हीच प्रार्थना आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule