समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात, चिमुकल्याचा मृत्यू
* चालक आणि क्लिनर मोबाईलवर रील बनवण्यात होते व्यस्त बुलढाणा, १९ एप्रिल (हिं.स.) : समृद्धी महामार्गावर बुलढाणा नजीक एका खाजगी लक्झरी बसचा आज, रविवारी भीषण अपघात झाला. चालक आणि क्लिनर मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त असल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि ब
अपघात


* चालक आणि क्लिनर मोबाईलवर रील बनवण्यात होते व्यस्त

बुलढाणा, १९ एप्रिल (हिं.स.) : समृद्धी महामार्गावर बुलढाणा नजीक एका खाजगी लक्झरी बसचा आज, रविवारी भीषण अपघात झाला. चालक आणि क्लिनर मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त असल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट पलटी झाली. या अपघातात दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला असून सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची घटना मेहकर येथील टोलनाक्याजवळ घडली. मुंबईहून पुसदकडे निघालेली ही खाजगी ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगाने जात होती. चालक आणि क्लिनर दोघेही मोबाईलवर व्हिडीओ रील बनवत असल्याचे बसमधील प्रवाशांकडून सांगितले जात आहे. याच नादात बसचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर पलटी झाली. बस अचानक पलटी झाल्याने मागून येणारी एक चारचाकी वाहन देखील बसवर येऊन धडकले. यामुळे चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले.

अपघात झाल्याचे कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधून नागरिकांना बाहेर काढले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत केली आणि जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात हलविले. मात्र, मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींवर स्थानिक नागरिकांनी स्वतः थातूरमातूर उपचार केल्याची माहिती आहे. दुर्दैवाने या अपघातात एका दीड वर्षाच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande