नाशिक: अशोकची पत्नी कल्पना खरात फरार; लूकआऊट नोटीस जारी
नाशिक, 02 एप्रिल (हिं.स.) : आर्थिक व लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याने शिर्डी पोलिसांनी तिच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या आदेशामुळे कल्पना खरात आता कोणत्य
नाशिक: अशोकची पत्नी कल्पना खरात फरार; लूकआऊट नोटीस जारी


नाशिक, 02 एप्रिल (हिं.स.) : आर्थिक व लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याने शिर्डी पोलिसांनी तिच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या आदेशामुळे कल्पना खरात आता कोणत्याही विमानतळातून परदेशात जाण्यापासून रोखली गेली आहे.

अशोक खरात प्रकरण नाशिकपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. महिलांवरील लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि अन्य आरोपांच्या पिंजऱ्यात सापडलेला अशोक खरात सध्या अटकेत आहे, तरीही त्याच्याविरुद्ध नवीन गुन्हे नोंदत राहिले आहेत.

या प्रकरणात अनेक पीडित महिलांनी समोर येऊन आर्थिक व लैंगिक अत्याचारांसंबंधी तक्रारी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, अशोक खरातचा सावकारकीचा व्यवसायही असून त्यात त्याची पत्नी कल्पना खरात देखील सहभागी होती. गुन्हा दाखल होताच कल्पना खरात पसार झाल्यामुळे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली.

शिर्डी पोलिसांकडून या नोटीशीनंतर देशभरातील सर्व विमानतळांवरून कल्पना खरातच्या परदेशात जाण्याची दैवभाग्याची वाट बंद करण्यात आली आहे. तसेच, शिर्डी येथे भोंदू अशोक खरात व त्याच्या पत्नीविरोधात शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande