
पुणे, 02 एप्रिल, (हिं.स.)। पुणे शहर आणि जिल्ह्यात आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली . अवघ्या एका तासात झालेल्या मुसळधार सरींमुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस, तर कुडजे गावात गारपीट झाली., आणि दापोडी यांसारख्या अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले, ज्यामुळे वाहतूक धीमी झाली.सिंहगड रोड परिसरात झाड कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत.
जिल्ह्यातील अनेक भागात, विशेषतः अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, कांदा आणि फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.सलग तिसऱ्या-चौथ्या दिवशी झालेल्या या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे
दोन महिने आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर टेंडर लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. सर्व फायनल झाले होते. कंत्राटदारांनी प्रत्यक्षात कामही सुरु केलं होतं. त्यामध्ये नालेसफाई असेल आणि इतर प्रक्रिया असतील, ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. पण या वर्षी पाऊस हा मार्च महिन्याच्या अखेरिस आला, असं महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या.
खडकवासला येथे 104.02 मिमी पाऊस पडलाय. सिंहगड रोडला 100 मिमीचा पाऊस पडला आहे. ही एक प्रकारची ढगफुटी आहे. कमी वेळात खूप जास्त पाऊस पडला आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. वारासुद्धा सोसाट्याचा होता. त्यामुळे हे नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरात पाणी गेलं आहे. पण प्रशासन आणि आम्ही सर्वजण मिळून काम करतोय. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पाठवली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी माहिती महापौरांनी दिली.
महापालिकेच्या हवामान केंद्रानुसार (पाऊस मिली मिटरमध्ये )
- खडकवासला - १०४.२
- सिंहगड रोड - १००.२
- कोंढवा येवलेवाडी - ९२.२
- बिबवेवाडी - ८१.४
- कोथरूड बावधण - ६६.६
- वारडे कर्वेनगर - ५९.२
- वानवडी रामटेकडी - ५४.६
- येरवडा कैलास - ५४
- भवानी पेठ - ५४
- कसबा विश्रामबागवाडा - ५३
- ढोले पाटील रोड - ५०.२
- शिवाजी नगर - ४८
- औंध बाणेर - ४३
- हडपसर मुंढवा - ३७
- नगररोड - ३६.४
आकडेवारी काय सांगते
- शहरात १४५ ठिकाणी पाणी साचले.
- ८२ ठिकाणी झाडे पडली
- ५० हून अधिक घरे आणि दुकानात पाणी शिरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु