
लातूर, 02 एप्रिल (हिं.स.)।
: यंदा पिकाची वाढ
समाधानकारक असली तरी काढणीच्या टप्प्यावर मजुरांची कमतरता आणि वाढलेले मजुरीदर यामुळे शेतमालकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. शेतशिवारात सध्या सकाळपासून सायंकाळपर्यंत काढणीची लगबग सुरू असली तरी खर्चाचा ताण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. कधी अपुऱ्या पावसामुळे तर कधी जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी वार्षिक गणित कोलमडत चालले आहे. परिणामी शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. आता शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. खते, बी-बियाणाचे दर दिवसेदिवस वाढतच आहेत. त्या तुलनेत शेतीमालाला भाव मात्र मिळत नाहीत.
जेथे दोन-तीन सालगडी लागायचे तेथे आता एकाच सालगड्यावर शेतीचा गाडा सुरू आहे. गुडीपाडव्याला सालगडी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून आली. पगार ठरला की सालगड्याला निम्मा पगार उचल म्हणून द्यावा लागत आहे. काही सालगडी अध्र्थ्यांवरच काम सोडून जातात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची मोठी अडचण होते.
आता बैल बारदाना शेतावर आणि सालगडी गावात अशी स्थिती आहे, शेतावर जागली राहिल्या नाहीत, मागेल तेवढा पगार देऊनही सालगडी शेतात मुक्कामी राहत नाहीत. सततचा दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कमी-अधिक होत असलेले भाव, बैलांच्या वाढलेल्या किंमती, मजुरांचा अभाव, वाढत्या बी-बियाणांच्या किमती या व इतर अडचणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी वैलबारदाना मोडीत काढला आहे. लहान शेतकऱ्यांना नोकर ठेवणे परवडत नाही.
पाऊस समाधानकारक पडला असल्याने पिकेही जोमात आली आहेत. मात्र काढणीसाठी मजुरांची कमतरता अन् वाढलेले मजुरीदर यामुळे शेतमालकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. शेतशिवारात सध्या सकाळपासून सायंकाळपर्यंत काढणीची लगबग सुरू असली तरी खचार्चा ताण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
ज्वारी काढणीसाठी महिला मजुरांना दिवसाकाठी तब्बल ५०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. पुरुष मजुरांचे दर त्याहून अधिक असल्याचे शेतकरी सांगतात. एवढेच नव्हे तर अनेक शेतशिवार गावापासून दूर असल्याने मजुरांना शेतात आणणे नेणे ही मोठी कसरत ठरत आहे. त्यासाठी वाहनभाडे म्हणून दररोज
सुमारे १००० रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे बटईने शेती करावी लागत आहे. सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. अवकाळी पावसामुळे आडव्या पडलेल्या गहू, ज्वारीच्या काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. बाहेरून मजुर आणावे लागत आहेत, तर या पिकांत उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. डुक्कर, हरिण यांसारख्या वन्यप्राण्यांच्या उपद्रव वाढला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीचा ठरत आहे.
परिणामी, एकूण काढणी खर्चात लक्षणीय वाढढ़ झाली आहे. ज्वारीचे उत्पादन हातात येण्याच्या टप्प्यावर असताना बियाणे, खत, औषधे, मशागत, पाणीपुरवठा या सर्व खचानंतर आता काढणीचा वाढलेला खर्च शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बाजारभाव अपेक्षित न मिळाल्यास उत्पादन खर्चही निघणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शेती व्यवसायात महिलांचा ७० टक्के वाटा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मोफत विविध योजनांचा फायदा मिळत असल्याने काम करण्याची वृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे शेती कामाला मजूर मिळत नाहीत, महिलांना चारशे पुरुषांना सहाशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे. पयायनि शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळले आहेत. उन्हा तान्हात काम करण्याऐवजी बांधकाम व्यावसायांकडे मजुरांचा अधिक ओढा आहे.
उत्पादन जेमतेम, त्यात काढणीला मजूर मिळेना
गुडीपाडव्याला नवीन सालगड्याचे पगार ठरविले जातात. या वर्षी सालगड्यांचे पगार सव्वा ते पावणे दोन लाख रुपयांवर गेले आहेत. शेती उत्पन्नाचा खर्च वाढल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीचा ठरत आहे. शेतीसाठी दोन-तीन सालगड्यांची आवश्यकता असायची परंतु आता एकाच सालगड्यावर शेती व्यवसाय केला जातो आहे. त्यात मजुरांची टंचाई सालगड्यांचे वाढते पगार, पीक काढणीचे वाढत चाललेले दर या व इतर विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडेनासे झाले आहे. ज्वारीचे पीक काढण्यासाठी एकरी चार ते पाच कट्टे (सध्याच्या भावाप्रमाणे आठ ते दहा हजार रुपये) ज्वारी द्यावी लागत आहे. या वर्षी सालगड्यांचे पगार दीड ते पावणे दोन लाखावर गेले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis