तेहरानमधील हवाई हल्ल्यात सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार कमाल खराजी जखमी
तेहरान, 02 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका सातत्याने इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे. फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धात इराणचे अनेक महत्त्वाचे नेते ठार झाले आहेत. याच हल्ल्यांमध्ये इराणचे माजी परराष्ट्र मंत्री आणि सर्वोच्च नेत
तेहरानमधील हवाई हल्ल्यात सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार कमाल खराजी जखमी


तेहरान, 02 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका सातत्याने इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे. फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धात इराणचे अनेक महत्त्वाचे नेते ठार झाले आहेत. याच हल्ल्यांमध्ये इराणचे माजी परराष्ट्र मंत्री आणि सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार कमाल खराजी हेही जखमी झाले असून त्यांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याची माहिती आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर खराजी गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या अहवालांनुसार, तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानावर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. इराणी माध्यमे आणि स्थानिक अहवालांमध्ये या घटनेला ‘हत्या करण्याचा प्रयत्न’ असे म्हटले जात आहे. खराजी हे इराणच्या ‘स्ट्रॅटेजिक फॉरेन रिलेशन्स कौन्सिल’चे अध्यक्ष आहेत. ही संस्था थेट देशाच्या सर्वोच्च नेत्यांना सल्ला देत असून परराष्ट्र धोरणाशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तिची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

अमेरिका आणि इस्रायलचे इराणवरील हल्ले सलग पाचव्या आठवड्यातही सुरू असतानाच ही घटना घडली आहे. इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तेहरानमध्ये खराजी यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. वृत्तानुसार, त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारीदेखील तेहरान, इस्फहान आणि शिराज येथे हवाई हल्ले झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली.

दक्षिण इराणमधील लारेस्तान येथे झालेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. दरम्यान, इराणच्या आरोग्य मंत्रालयाने सोशल मीडियावर काही छायाचित्रे पोस्ट करत राजधानीतील १०० वर्षे जुने वैद्यकीय संशोधन केंद्र हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे.आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हुसेन केरमनपोर यांनी एक्स वरील पोस्टमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाने या ‘आक्रमकते’कडे लक्ष द्यावे, अशी अपील केली. त्यांनी या घटनेला जागतिक आरोग्य व्यवस्थेवरील थेट हल्ला असे संबोधले.

ते म्हणाले, “जागतिक आरोग्य व्यवस्थेचा शंभर वर्षांचा आधारस्तंभ असलेल्या ‘इराणी पाश्चर इन्स्टिट्यूट’वर केलेले आक्रमण हे जागतिक आरोग्य व्यवस्थेवरील थेट हल्ला आहे. हे जिनिव्हा करार आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या (IHL) तत्त्वांचे उल्लंघन आहे.” त्यांनी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था आणि इतर जागतिक आरोग्य संघटनांना टॅग करत म्हटले की, “आम्ही डब्ल्यूएचओ, आयसीआरसी आणि जागतिक आरोग्य संस्थांना या हल्ल्याचा निषेध करण्याचे, नुकसानीचे मूल्यांकन करण्याचे आणि पुनर्बांधणीसाठी मदत करण्याचे आवाहन करतो.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande