पालकांची देखभाल न करणाऱ्या पाल्यांवर आता कडक कारवाईचे संकेत
नांदेड, 23 एप्रिल (हिं.स.)। ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे आणि त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी, यासाठी ''ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत'' काही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत, पालकांची देखभाल न करणाऱ्या पाल्यांवर आता कडक का
पालकांची देखभाल न करणाऱ्या पाल्यांवर आता कडक कारवाईचे संकेत


नांदेड, 23 एप्रिल (हिं.स.)।

ज्येष्ठ नागरिकांना

सन्मानाने जगता यावे आणि त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी, यासाठी 'ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत' काही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत, पालकांची देखभाल न करणाऱ्या पाल्यांवर आता कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पाल्यांकडून दरमहा निर्वाह खर्च मिळवण्याचा कायदेशीर अधिकार आहे. या कायद्यानुसार पाल्यांमध्ये केवळ मुले किंवा मुलीच नव्हे, तर नातवंडे आणि रक्ताच्या नात्यातील मुला-मुलींचाही

समावेश करण्यात आला आहे. पाल्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी चरितार्थाची रक्कम ही दरमहा १०,००० पेक्षा पेक्षा जास्त असणार नाही. जे पाल्य आपल्या पालकांचा सांभाळ करणार नाहीत, त्यांना ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा ५,००० रुपये दंड अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जे ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या उत्पन्नातून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत, अशा वृद्धांना पोटगी किंवा निर्वाह भत्त्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज दाखल करता येईल. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज असते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande