प्रा. संग्राम आंदे यांची बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड
नांदेड, 23 एप्रिल (हिं.स.)। गेली अनेक वर्षापासून प्रा.संग्राम आंदे, यांनी सामाजिक, व शैक्षणिक, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला त्यांना आतापर्यंत १०० पुरस्कार मिळाले असून
प्रा. संग्राम आंदे यांची बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड


नांदेड, 23 एप्रिल (हिं.स.)।

गेली अनेक वर्षापासून प्रा.संग्राम आंदे, यांनी

सामाजिक, व शैक्षणिक, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला त्यांना आतापर्यंत १०० पुरस्कार मिळाले असून आता त्यांची बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील समाजशास्त्र या विषयाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. त्यांचे आतापर्यंतचे शैक्षणिक कार्य अनमोल ठरले आहे. अनेक ग्रंथाचे लेखन अनेक आर्टिकलचे लेखन त्यांनी आतापर्यंत केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शंभर पुरस्काराचा आकडा पार करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नावाचा ठसा उमटवला आहे एक अष्टपैलूचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी.अडकिने, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्राचार्य गोंने, प्रा.डॉ. ङि के. आहेर, प्रा. दिगाबर नेटके, इत्यादींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande