हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे अमित शाहांची आसाममधील सभा रद्द, फोनवर साधला संवाद
दिसपूर, 03 एप्रिल (हिं.स.)। आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शुक्रवारी गोलकगंज येथे होणारी निवडणूक सभा त्यांच्या हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली. सूत्रांनुसार, अमित शाह दोन दिवसांच्या आ
Assam Amit Shah Rall Cancelled


दिसपूर, 03 एप्रिल (हिं.स.)। आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शुक्रवारी गोलकगंज येथे होणारी निवडणूक सभा त्यांच्या हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली.

सूत्रांनुसार, अमित शाह दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून, शुक्रवार हा त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज दुपारी गोलकगंजमध्ये ते एका जाहीर सभेला संबोधित करणार होते, परंतु हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे सभा रद्द करावी लागली. तथापि, सभा रद्द होऊनही अमित शाह यांनी फोनवरून जनतेला संबोधित केले.

विशेष म्हणजे, त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवसाचे सर्व नियोजित कार्यक्रम सुरळीत पार पडले. गोलकगंजमधील सभेसह शुक्रवारीही त्यांच्या अनेक निवडणूक सभा नियोजित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande