
नंदुरबार , 03 एप्रिल (हिं.स.)– शहरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे मंगल बाजार, कृषी बाजार समिती धान्य वाहून गेले बाजारात देखील बाजार विक्रेत्यांची मोठी धावपळ झाली तसेच शहरात ठिकठिकाणी झाडे झुडपात देखील पंडित त्यात वीज महामंडळाच्या लपंडावाच्या खेळ देखील सुरू होता. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या तडाकापासून काही वेळ दिलासा मिळाला तर अवकाळी पावसामुळे शहरातील नागरिक हैराण झाली. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागाला पुन्हा जोरदार वादळी पावसाने आणि गारपीटीने झोडपून काढले असून भालेर व खोंडामळी परिसरातील शेतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतीची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही तातडीने करावी, असे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ३० आणि ३१ मार्च रोजी नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात मोठी गारपीट झाली होती. काही मिनिटांच्या या तडाख्यात कांदा, गहू, हरभरा आणि टरबूज पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळं शेतांमध्ये उभे असलेले गहू आणि काढणी करुन ठेवलेला हरभरा खराब झाला. काही ठिकाणी कापणी करुन ठेवलेल्या गव्हाची मोठी नासाडी झाली. त्या पाठोपाठ पुन्हा याच भागात जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला. वादळी पावसामुळे नंदुरबारच्या पूर्वापट्ट्यातील पिकांना फटका बसल्याचे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर