पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर
मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली ह
पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर


मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.)

: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेचा निकाल ९ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता.परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती.

आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. चाचणी नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर १७, कळंबोली येथे पार पडणार असून ती डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.

उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या तयारीच्या दृष्टीने याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. चाचणीचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande