अहमदपूर येथे मनसेच्या भव्य सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ
लातूर, 03 एप्रिल (हिं.स.)। : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अहमदपूर येथे मनसेच्या वतीने व्यापक सभासद नोंदणी अभियान जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्साहात सुरू करण्यात आले असून हे अभिया
मनसे


लातूर, 03 एप्रिल (हिं.स.)।

: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अहमदपूर येथे मनसेच्या वतीने व्यापक सभासद नोंदणी अभियान जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्साहात सुरू करण्यात आले असून हे अभियान आगामी महिनाभर मनसे कार्यालयातून अखंडपणे सुरू राहणार आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि स्थानिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या मनसेच्या विचारधारेशी सर्वसामान्यांना जोडण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी तालुकाध्यक्ष कैलाश धुलगुंडे, शहराध्यक्ष अतिष गायकवाड, सचिन सुळ, कल्याण माने, करण धुलगुंडे, माधव शेवरे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभियानाअंतर्गत केवळ शहरातच नव्हे तर अहमदपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन सभासद नोंदणी केली जाणार असून युवक, शेतकरी, कामगार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मनसेच्या विचारांना बळ देण्यासाठी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी केले आहे. सभासद नोंदणीसाठी इच्छुकांनी अहमदपूर येथील मनसे कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी करून घ्यावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी मनसे सैनिकांनी मोठे परिश्रम घेतले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande