
लातूर, 03 एप्रिल (हिं.स.)।
तगरखेडा येथे पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप संदर्भात गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री संतोष शिनगारे, लातूर जिल्हा मोबीलायझर शिवलेश्वर मेदने व श्री विशाल जाधव उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक श्री संगमनाथ उडबळे यांनी केले. पानी फाउंडेशनचा पाणी ते शाश्वत शेती पर्यंतचा प्रवास श्री शिवलेश्वर मेदने यांनी सांगितला. तर सत्यमेव जयते फार्मर कप चे स्वरूप, कार्यपद्धती व गट पद्धतीने केलेल्या शेतीमुळे शेतकऱ्यांचा होणारा फायदा व मिळणारी भरघोस रकमेची बक्षिसे याविषयी सविस्तर मार्गदर्शन विभागीय समन्वयक श्री संतोष शिनगारे केले. बैठकीनंतर 11 सदस्यांचा एक असे 8 शेतकरी गट तयार करण्यात आले. यात महिला शेतकऱ्यांचे 2 शेतीगट तयार करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis