
लातूर, 03 एप्रिल (हिं.स.)।
राजराजेश्वर भगवान परशुराम जन्मोत्सव सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने यंदाही उत्साहात साजरा करण्यात येणार यंदाच्या उत्सवात व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, महिलांसाठी विविध उपक्रम; तसेच समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भगवान परशुराम मंदिरात यज्ञयागाचाही विशेष कार्यक्रम होणार आहे. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. संतोष देशपांडे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. बैठकीस ब्राह्मण सेवा संघ, लोकमान्य टिळक विचार मंच, माध्व मंडळ (उत्तरादी मठ), लक्ष्मी
नृसिंह बचत गट, समर्थ अन्न सेवा, विद्यावर्धिनी प्रतिष्ठान, परशुराम सेवा संघ, पेशवा युवा मंच, ब्राह्मण ऐक्य परिषद, इइछ ग्रुप, बॉन्ड ऑर्गनायझेशन, पुरोहित संघ; तसेच विविध महिला गट आणि अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उद्योजकांसाठी प्रदर्शन भरविणे, १०० रक्तदात्यांचा संकल्प करण्यात आला. महिला मंडळाच्या वतीने लातूरमध्ये ब्राह्मवृंद परिवारासाठी विशेष शॉपिंग फेस्टिव्हल आयोजिण्यात येणार आहे. यात समूहातील नागरिकांना त्यांच्या व्यवसायातील उत्पादने विक्रीसाठी स्टॉल लावण्याची संधी मिळणार असून, हे स्टॉल मोफत आहेत. स्टॉल बुकिंगसाठी अनुराधा औसेकर व धनश्री जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. संतोष देशपांडे यांनी दिली आहे. अॅड. संजय पांडे यांनी सुरू केलेला उपक्रम गेल्या बारा वर्षांपासून राबवला जात आहे, अशी माहिती डॉ. देशपांडे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis