फार्मर आयडी नाही, ३५ हजार शेतकऱ्यांना बसणार फटका
अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.) कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले असतानाही जिल्ह्यातील ३५ हजार २२१ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली न
फार्मर आयडी नाही, ३५ हजार शेतकऱ्यांना बसणार फटका


अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.)

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले असतानाही जिल्ह्यातील ३५ हजार २२१ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. या शेतकऱ्यांना त्यामुळे येत्या हंगामात खते, बियाणे व औषधी, अशा कृषिनिविष्ठा प्राप्त करण्यासाठी अडचणी जाणार आहेत. राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून अॅग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात १५ एप्रिलपासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. जिल्ह्यात चार लाख ५६ हजार ३६९ खातेदार संख्या आहे. त्यापैकी चार लाख २१ हजार १३९ खातेदारांनी फार्मर आयडी नोंदणी केली आहे. अद्यापही ३५ हजार २२१ शेतकऱ्यांनी नोंदणीच केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी २० मे पूर्वी फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन कृषी उपसंचालक वरुण देशमुख यांनी केले आहे. मदतीसाठी हेल्पडेस्क कार्यान्वित करण्यात आला असून अमरावती विभागासाठी अजितकुमार गेजगे यांच्याशी ९६५७१०९८०९ या भ्रमनध्वनीवर संपर्क साधता येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या नजीकच्या सेवासुविधा केंद्रावरून नोंदणी करून फार्मर आयडी मिळवून घ्यावा किंवा स्वतः अॅग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्याची स्थिती उपविभाग खातेदार संख्या नोंदणी अमरावती उपविभाग १६३२९३ १३९७४६ (अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, धामणगावरेल्वे, चांदूररेल्वे) मोर्शी उपविभाग १४३६१३ १३७९०७ (मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, तिवसा) अचलपूर उपविभाग १४९४५४ १४३४८६ (अचलपूर, अंजनगावसुर्जी, धारणी, चिखलदरा, दर्यापूर)

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande