चंद्रपूर : ई-लिलावाद्वारे पोर्टलवर ट्रकची विक्री
चंद्रपूर, 30 एप्रिल (हिं.स.)।समहाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, चंद्रपूर कार्यालय अंतर्गत एका ट्रक वाहनांचा 7 मे 2026 रोजी दुपारी 11 ते 12 या वेळेत ई – लिलाव करण्यात येणार आहे. इच्छुकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ट
चंद्रपूर : ई-लिलावाद्वारे पोर्टलवर ट्रकची विक्री


चंद्रपूर, 30 एप्रिल (हिं.स.)।समहाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, चंद्रपूर कार्यालय अंतर्गत एका ट्रक वाहनांचा 7 मे 2026 रोजी दुपारी 11 ते 12 या वेळेत ई – लिलाव करण्यात येणार आहे. इच्छुकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ट्रक क्रमांक एम.एच 15 डी .के. 5438 असून खरेदी वर्ष 1 जून 2013 आहे. ट्रकची अनामत रक्कम 25 हजार रुपये आहे. सदर वाहनाची www.market.neml.in या पोर्टलवर विक्री करण्यात येत आहे.

अटी /शर्ती : सदर ई-लिलाव वाहने नियमानुसार आदिवासी भागातील आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार अवजड परवानाधारक गरजू व होतकरु बांधवांना आयोजित करण्यात येत आहे. लिलावामध्ये जे आदिवासी बांधव सहभागी होतील, अशा बांधवांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे अनिवार्य राहील. वाहने विक्री केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करूनच वाहने हस्तांतरित करण्यात येतील तसेच वाहन ज्या स्थितीत आहे. त्या स्थितीत घ्यावे लागेल. अंतिम बोली मंजूर वा नामंजूर करण्याचा व निर्णय घेण्याचा अधिकार प्रादेशिक व्यवस्थापक चंद्रपूर यांनी राखून ठेवलेला आहे. लिलावाशी संबंधीत सर्व बाबतीत प्रादेशिक व्यवस्थापक यांचा अंतिम निर्णय बंधनकारक

सदर ई-लिलावातील इतर अटी - शर्ती www.market.neml.in या Neml च्या पोर्टलवर उपलब्ध होतील. Neml वर संपर्कासाठी राजरतन बागडे (मो. 8421549842) संदेश वर्मा (मो. 9325440639) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रादेशिक व्यवस्थापक बी. एस. बरकमकर यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande