
अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.) -
अमरावती जिल्हा वकील संघाच्या २०२६-२०२७ या नवीन वर्षाच्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी आज गुरुवारी मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी वकील संघाने आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली होती . आज सकाळी १० वाजल्यापासून जिल्हा न्यायालय परिसरात मतदानाला सुरुवात झाली त्यासाठी एक हजार ५७६ वकिलांनी नोंदणी केली असून, त्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात असल्यामुळे चुरस अधिक वाढल्याचे दिसून येते. अॅड. प्रशांत रमेश देशमुख, अॅड. धनराज नंदलाल साधवानी व अॅड. अनिल तेजराज विश्वकर्मा या तीन उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी महिला व पुरुषांमधून प्रत्येकी एक, असे दोन पदाधिकारी निवडल्या जाणार आहेत. त्याकरिता पुरुष गटातून अॅड. आर. एस. भोयर, अॅड. नरेंद्र एस. गजभिये, अॅड. एमडी (आय. जी.) नुराणी व अॅड. डॉ. धनंजय तोटे, अशी चार उमेदवारांमध्ये चौरंगी लढत दिसून येते. महिला उपाध्यक्षपदाकरिता तिरंगी लढत होईल. त्याकरिता अॅड. भावना ठाकरे (खंडारे), अॅड. भूमिका वानखडे, अॅड. प्राजक्ता वरुडकर या तिघी रिंगणात आहेत. मुख्य सचिवपदासाठी अॅड. गिरीश धर्माळे व अॅड. सचिन पंडितकर, अशी थेट लढत आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ग्रंथालय सचिवपदासाठी अॅड. सुमित गोविंदराव शर्मा यांचा एकमेव उमेदवारी अर्ज रिंगणात असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्यांच्या यावर्षी एकूण आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. पुरुष गटातील पाच सदस्यांसाठी अॅड. श्रीधर अकोलकर, अॅड. प्रवीण आठवले, अॅड. रोहण बाखडे, अॅड. आदित्य गुप्ता, अॅड. अक्षय खराटे, अॅड. रमेश रंगारकर व अॅड. गौरव राऊत, असे सात जण रिंगणात आहेत. तर महिला सदस्यांच्या तीन जागांसाठी अॅड. रश्मी दासूरकर, अॅड. शीतल गायन, अॅड. सुरभी कुर्वे, अॅड. ऋतुजा पठारे या चार महिला वकील रिंगणात आहेत. शुक्रवार एक मे रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून मतमोजणीला सुरवात होईल.दुपारी दोन वाजेपर्यत ४५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी