
लातूर, 30 एप्रिल (हिं.स.) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे ३० एप्रिल आणि १ मे २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेन.
पालकमंत्री भोसले यांचे ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल व लातूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. दुपारी ४.३० वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सायंकाळी ७ वाजता त्यांचे हस्ते नूतनीकृत सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन होईल. त्यानंतर लातूर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल व मुक्काम.महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त १ मे रोजी सकाळी ८ वाजता बाभळगाव येथील पोलीस मुख्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रमास पालकमंत्री श्री. भोसले उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० वाजता लातूर येथून विमानाने नवी मुंबईकडे प्रयाण करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis