लातूर - चाकूर तालुक्यात १ मेपासून स्व-गणनेस प्रारंभ
लातूर, 30 एप्रिल, (हिं.स.)। भारत सरकारच्या ''जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत चाकूर तालुक्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ''स्व-गणने''ची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या राष्ट्रीय उपक्रमात तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे
स्वगणना


लातूर, 30 एप्रिल, (हिं.स.)। भारत सरकारच्या 'जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत चाकूर तालुक्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत 'स्व-गणने'ची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या राष्ट्रीय उपक्रमात तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन चार्ज अधिकारी तथा तहसीलदार नरसिंग जाधव यांनी नागरिकांना केले आहे.

'स्व-गणना' ही एक आधुनिक डिजिटल सुविधा आहे, ज्यामध्ये नागरिक प्रगणकाची वाट न पाहता तथा स्वतःहून, घरबसल्या अधिकृत पोर्टलद्वारे आपल्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकतात. यामुळे वेळेची बचत होते आणि नागरिकांना स्वतःच्या सोयीनुसार अचूक माहिती भरण्याचे स्वातंत्र्य मिळते. जिल्हा जनगणना अधिकारी जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड आणि उपविभागीय जनगणना अधिकारी मंजुषा लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर प्रशासनाने या मोहिमेची पूर्ण तयारी केली आहे.

नागरिकांनी https://se.ce>>>>fsus.gov.i>>>> f या अधिकृत पोर्टलला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि ओटीपी द्वारे लॉग इन करावे. स्वतःची व कुटुंबाची माहिती (भाषा, पत्ता व नकाशावरील स्थान) अचूक भरावी. माहिती भरून 'फायनल सबमिट' केल्यावर मिळणारा ११ अंकी (एआयडी) जपून ठेवावा व तो नंतर प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना दाखवावा.

प्रगणकांद्वारे घर गणना (१६ मे ते १४ जून) जे नागरिक १ मे ते १५ मे या काळात 'स्व-गणना' करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी प्रशासनातर्फे दुसऱ्या टप्प्याची आखणी करण्यात आली आहे. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त केलेले प्रगणक तालुक्यातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील. ज्या नागरिकांनी 'स्व-गणना' पूर्ण केली आहे, त्यांनी प्रगणक घरी आल्यावर त्यांना फक्त आपला ११ अंकी आयडी दाखवावा. यामुळे त्यांची प्रक्रिया अवघ्या काही सेकंदात पूर्ण होईल. जनगणनेची माहिती भविष्यात तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या नियोजनासाठी पाया ठरणार आहे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande