रत्नागिरी : बंदरातील नौकांचे सांगाडे हटविण्याची सूचना
रत्नागिरी, 30 एप्रिल, (हिं. स.) : मिरकरवाडा मत्स्य बंदरात बंद, विनावापर, मोडलेल्या स्थितीत असलेल्या, बुडालेल्या व नष्ट झालेल्या नौकांचे इंजिन व इतर पार्ट्स काढून घेऊन कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे/ अवशेष बंदरात सोडून दिलेले आहेत. यामुळ
मच्छीमारी नौकांचे सांगाडे


रत्नागिरी, 30 एप्रिल, (हिं. स.) : मिरकरवाडा मत्स्य बंदरात बंद, विनावापर, मोडलेल्या स्थितीत असलेल्या, बुडालेल्या व नष्ट झालेल्या नौकांचे इंजिन व इतर पार्ट्स काढून घेऊन कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे/ अवशेष बंदरात सोडून दिलेले आहेत. यामुळे नौकानयनासाठी अडथळा होत आहे. बंदरातील जागा अनावश्यक व्यापली गेली आहे. हा अडथळा मच्छीमारी नौकांसाठी धोकादायक झाला आहे.

नौका/सांगाडे/अवशेष संबंधित नौकामालकांनी 8 मेपर्यंत बंदरातून स्वखर्चाने काढून टाकावेत, अन्यथा या नौका मत्स्यव्यवसाय विभागामार्फत काढून टाकण्यात येतील व संबंधित नौकामालकांना कोणत्याही नुकसानभरपाईचा दावा करता येणार नाही. होण्याऱ्या कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, याची नोंद घेण्याबाबत मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande