
परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।
बल्लारशा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस ही महत्त्वाची रेल्वे गाडी काही दिवस दादरपर्यंतच धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 व 17 वर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे ट्रॅफिक ब्लॉकचा कालावधी वाढविण्यात आला आहे. हे काम रेल लॅन्ड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांच्या मार्फत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गाडी क्रमांक 11002 बल्लारशा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस 18 मे पर्यंत दादर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. या कालावधीत ही गाडी दादरपर्यंतच धावेल.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच या कामांमुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त करत प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis