निम्न दुधनातून 15 मेपासून सुटणार पाणीपाळी : आमदार डॉ. राहुल पाटील यांचा पाठपुरावा
परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)। निम्न दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडले जात असून तिसरी पाणीपाळी 15 मेपासून सुटणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी ऊन्हाळी पिकांसह ऊस व चारापिकांची लागवड करावी, असे आवाहन आमदार डॉ
निम्न दुधनातून 15 मेपासून सुटणार पाणीपाळी : आमदार डॉ. राहुल पाटील यांचा पाठपुरावा


परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।

निम्न दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडले जात असून तिसरी पाणीपाळी 15 मेपासून सुटणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी ऊन्हाळी पिकांसह ऊस व चारापिकांची लागवड करावी, असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.

निम्न दुधना प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात परभणी तालुक्याचा समावेश होतो. झरी, साडेगांव शिवारातून आलेल्या कालव्याद्वारे उन्हाळी हंगामासाठी पाणी दिले जाते. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे यंदा उन्हाळी हंगामासाठी चार पाणीपाळीचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी 16 मार्च आणि 16 एप्रिलला पाणी सोडले होते. त्यानंतर आता तिसर्यांदा 15 मे रोजी पाणी सोडले जाणार आहे. आपल्या भागात उसाचे क्षेत्र वाढावे यासाठी आमदार डॉ. राहुल पाटील हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी ऊसाची लागवड करावी, या सोबतच चारा पिके घ्यावीत, मे अखेरीस हळद पिकाची लागवड करता येऊ शकते त्यामुळे या सिंचनाचा लाभ हळद पिकाला देखील होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande