महाराष्ट्रात ‘वी’च्या 5-जी सेवांचा वेगवान विस्तार
मुंबई, 06 एप्रिल (हिं.स.) : राज्याच्या पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरांमध्ये -जी सेवांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडिया (‘वी’) आता महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये आपल्या 5-
वीचा संग्रहित लोगो


मुंबई, 06 एप्रिल (हिं.स.) : राज्याच्या पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरांमध्ये -जी सेवांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडिया (‘वी’) आता महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये आपल्या 5-जी सेवांचा वेगाने विस्तार करत आहे.

महाराष्ट्रातील मोबाईल नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने कंपनीने आणखी 8 महत्त्वाच्या शहरांमध्ये 5-जी सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. यात कोल्हापूर, वसई, नांदेड, जळगाव, सातारा, मालेगाव, शिर्डी आणि धुळे या शहरांचा समावेश आहे. कंपनीच्या नियोजित विस्तार योजनेनुसार, मे २०२६ पर्यंत अकोला, मिरज, चंद्रपूर, सोलापूर, उल्हासनगर, भिवंडी, अहिल्यानगर, अमरावती, लातूर आणि गोवा या शहरांमध्येही 5-जी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

धोरणात्मक विस्तारावर भर

‘वी’ने आपल्या विस्तारासाठी औद्योगिक कॉरिडॉर, उच्च डेटा वापर असलेली क्षेत्रे आणि विकसित होत असलेले शहरी क्लस्टर्स यांना प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र हे देशाच्या एकूण जीडीपीमध्ये 13 टक्क्यांहून अधिक योगदान देणारे ‘आर्थिक पॉवरहाऊस’ असल्यामुळे, या राज्यात 5-जी पायाभूत सुविधा वाढवण्यावर कंपनीचा विशेष भर आहे. औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रांचा विचार करून निवडलेल्या या शहरांमध्ये ५जी सेवा उपलब्ध करून देत, ‘वी’ डिजिटल परिवर्तन आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे.

या विस्ताराबाबत माहिती देताना वोडाफोन आयडियाचे क्लस्टर बिझनेस हेड (महाराष्ट्र आणि गोवा) आनंद दाणी म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आमचे अस्तित्व अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील यशाच्या जोरावर आता आम्ही आणखी 8 शहरांमध्ये विस्तार करत आहोत. उच्च डेटा वापर आणि मागणी असलेल्या ठिकाणांना प्राधान्य देत, ग्राहकांना अधिक चांगला आणि सातत्यपूर्ण नेटवर्क अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande