सोलापूर : द्राक्ष निर्यात हंगाम आता जवळपास संपण्याच्या मार्गावर
सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, खराब हवामान व अवकाळीमुळे गुणवत्तेवर परिणाम झाला असून केवळ सात -आठ टक्के निर्यातक्षम दर्जाच्या बागांतील फळतोडणी शिल्लक राहिली आहे. द्राक्ष निर्यात
सोलापूर : द्राक्ष निर्यात हंगाम आता जवळपास संपण्याच्या मार्गावर


सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, खराब हवामान व अवकाळीमुळे गुणवत्तेवर परिणाम झाला असून केवळ सात -आठ टक्के निर्यातक्षम दर्जाच्या बागांतील फळतोडणी शिल्लक राहिली आहे.

द्राक्ष निर्यात हंगाम आता जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र, यंदाचा हंगाम आव्हानात्मक राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा युरोपमध्ये होणारी निर्यात २०-२५ टक्क्यांनी घटली आहे. दरवर्षी युरोपमध्ये आठ हजार कंटेनर द्राक्ष निर्यात व्हायची, यंदा ती पाच हजार कंटेनर राहील. यंदा द्राक्ष उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे आणखी सुमारे १०० कंटेनर माल बागांत शिल्लक राहिले आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा मध्य पूर्वेकडील मार्गांवर मोठा परिणाम झाला आहे. माएर्स्क, हॅपग - लॉयडसारख्या प्रमुख शिपिंग कंपन्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे केवळ स्थानिक छोट्या - मोठ्या कंपन्याच कार्यरत आहेत. परंतु मालवाहतुकीचे दर प्रति कंटेनर सात हजार - साडेसात हजार अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढले आहेत. बंदरांवर अडकलेले कंटेनर व युद्ध अधिभारामुळे मार्गातील मालावरही परिणाम झाला आहे. युरोपात माल पोहोचण्याचा ३०-३२ दिवसांचा कालावधी ४० दिवसांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे निर्यातदारांना आर्थिक दबावाला सामोरे जावे लागत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande