
नंदुरबार,, 07 एप्रिल (हिं.स.) महाराष्ट्र राज्याच्या नवीन युवा धोरणानुसार, युवक-युवतींच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जिल्हा युवा पुरस्कार 2025-26’ जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र युवक, युवती आणि नोंदणीकृत संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.
पुरस्काराचे स्वरूप
युवक व युवती (प्रत्येकी एक): गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि 10 हजार रुपये रोख.
नोंदणीकृत संस्था: गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि 50 हजार रुपये रोख.
निवडीचे निकष आणि अटी
कार्यकाळ: अर्जदाराने 01 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील मागील तीन वर्षांत केलेले सामाजिक
कार्य आणि कामगिरी विचारात घेतली जाईल .
वास्तव्य: अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 05 वर्ष वास्तव्याचे अधिकृत प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
मर्यादा: एका जिल्ह्यातून हा पुरस्कार प्राप्त झालेली व्यक्ती इतर जिल्ह्यात अर्ज करण्यास पात्र राहणार
नाही .
कार्याचे क्षेत्र: सामाजिक कार्य, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, आपत्ती
व्यवस्थापन, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि राष्ट्र उभारणीसाठी केलेले सहाय्यभूत कार्य या आधारावर
मूल्यांकन केले जाईल.
अर्ज प्रक्रिया
इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक साक्षांकित कागदपत्रे आणि तीन पासपोर्ट साईज फोटो एका
पुस्तिकेच्या स्वरूपात बंद लिफाफ्यात जमा करायचे आहेत.
मुदत: 17 एप्रिल 2026.
वेळ: सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळ).
पत्ता: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, खामगांव रोड, साक्री नाका,
नंदुरबार - 425412 .
पुरस्काराचे वितरण 01 मे 2026 रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. अधिक माहितीसाठी क्रीडा
अधिकारी संजय बेलोरकर यांच्याशी 8888797922 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही जिल्हा क्रीडा
अधिकारी श्रीमती पाटील यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर