
लातूर, 08 एप्रिल, (हिं.स.)। सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि मानवतेचा संदेश जपत, सम्राट मित्र मंडळ सामाजिक संघटना, अहमदपूर यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त एक भव्य आणि प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून अनोख्या पध्दतीने अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पूज्य भंते महाविरोध थेरो (काळेगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथरावजी जोंधळे साहेब हे होते.
या प्रसंगी,भीमसैनिकांनी केवळ घोषणांनी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून आपल्या महामानवाला अभिवादन केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या विचाराने प्रेरित होऊन तब्बल १०१ जणांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला एक आगळावेगळा आणि हृदयस्पर्शी सन्मान अर्पण केला.
संपूर्ण दिवस रक्तदान करणाऱ्या युवकांचा उत्साह, समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि महामानवांविषयीची कृतज्ञता यांचे दर्शन घडवत होता. हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून, समाजातील एकतेचा, सेवाभावाचा आणि मानवतेचा सजीव संदेश ठरला.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सम्राट मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष शरद सोनकांबळे, शहराध्यक्ष बजरंग गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष गायकवाड, सचिन वाघमारे, महादेव बनसोडे, बालाजी ढवळे,शरद कांबळे ,सचिन बानाटे, आकाश पवार, शिक्षक नेते शिवाजीराव भालेराव,संविधान कदम, राहुल वाघमारे, रितेश रायभोळे, डॉ. बालाजी थिट्टे, चंद्रकांत कांबळे, विकास कांबळे, यादव सोनकांबळे, धोंडूतात्या शिंदे, रत्नदीप प्रचंडेकर, लखन गायकवाड, मिलिंद कदम, गौतम कांबळे, माधवराव तिगोटे ,सिद्धार्थ गायकवाड,मोहम्मद पठाण, रोहण जाधव, बालाजी मस्के, प्रशांतजी जाभाडे, राजकुमार नरवटे राळगा सरपंच, विकास ससाणे,साई कांबळे, आकाश वाघमारे सोनू सोनकांबळे रमेश लेंडेगावकर, जयराम चिलकरवाड, जय गुळवे, अभय गायकवाड, हर्ष भालेराव, शुभम कांबळे,उत्तम गायकवाड संगमेश्वर बनसोडे सतीश कदम,प्रदीप जाभाडे, संतोष सोनकांबळे विकास ससाणे, साई कांबळे,आकाश वाघमारे सोनू सोनकांबळे रमेश लेंडेगावकर सर,शरद शिंदे कोणाळीकर, जयराम चिलकरवाड आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
शेवटी, या रक्तदान शिबिराने पुन्हा एकदा सिद्ध केले की, महामानवांचे विचार केवळ पुस्तकांत नाहीत, तर ते कृतीतून जिवंत ठेवले जातात हे पून्हा एकदा सिध्द झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis