लातूर - अहमदपुरात 'फुले दांपत्य' स्मारकासाठी महात्मा फुले ब्रिगेडचे नगराध्यक्षांना निवेदन
लातूर, 08 एप्रिल, (हिं.स.)। क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा वारसा जपण्यासाठी, अहमदपूर शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेल्या जुन्या नगर परिषदेच्या जागेत या ''फुले दांपत्य'' यांचे भव्य पूर्णाक
निवेदन


लातूर, 08 एप्रिल, (हिं.स.)। क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा वारसा जपण्यासाठी, अहमदपूर शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेल्या जुन्या नगर परिषदेच्या जागेत या 'फुले दांपत्य' यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे बसवून स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी नगराध्यक्ष स्वप्नील व्हत्ते आणि मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांना संघटनेच्या वतीने अधिकृत निवेदन देण्यात आले.

अहमदपूर शहरातील आंबेजोगाई रोड लगत, तहसील कार्यालयासमोर असलेल्या जुन्या नगर परिषदेची जागा या स्मारकासाठी अत्यंत योग्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या ठिकाणी दोन्ही महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे बसवल्यास शहराच्या वैभवात भर पडेल आणि येणाऱ्या पिढीला त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

निवेदन देतेवेळी महात्मा फुले ब्रिगेडचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने दत्तात्रय चांबारगे (माळी): महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

उत्तम जी. गोरे: प्रदेश सरचिटणीस

शाम गोरे: प्रदेश चिटणीस (युवक आघाडी)

देवराज गोरे: सहसचिव, मराठवाडा

बाबुराव आरसुडे: लातूर जिल्हाध्यक्ष

कविता गोरे: जिल्हा उपाध्यक्षा (महिला आघाडी)

मेघा माळी: शहराध्यक्षा, अहमदपूर (महिला आघाडी)

समर्थ गोरे: सोशल मीडिया प्रमुख (विद्यार्थी आघाडी)

राम शिंदे: शहराध्यक्ष

यासह महात्मा फुले युवामंच, राजुरचे संस्थापक अध्यक्ष संतोष गोरे, सदस्य कृष्णा गोरे, दिलीप ससाने, गंगाधर सूर्यवंशी यांच्यासह अनेक फुलेप्रेमींची उपस्थिती होती.

निवेदन स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष स्वप्नील व्हत्ते यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या स्मारकामुळे अहमदपूर शहरात सामाजिक क्रांतीच्या जनकांचा सन्मान होणार असल्याने सर्वच स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande