
लातूर, 08 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर हे अहमदपूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी नवनिर्वाचित नगरसेविका उषा हणमंत देवकत्ते यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण महाभियान उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला.
पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण महाभियान उपक्रमांतर्गत भाजपच्या वतीने अहमदपूर येथे विविध संघटनात्मक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हाध्यक्षांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या कार्याचे कौतुक केले व आगामी काळात जनसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी भाजपचे दिग्गज नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्यात प्रामुख्याने गणेश दादा हाके प्रदेश प्रवक्ते, भाजप,स्वप्निल व्हत्ते नगराध्यक्ष, अहमदपूर,अयोध्याताई केंद्रे उपसभापती, पंचायत समिती,चंद्रप्रकाश हंगे तालुकाध्यक्ष,अशोक काका केंद्रे ज्येष्ठ नेते,भारत चामे, राजकुमार मजगे, बाळासाहेब होळकर यासह गुट्टे ताई, चंद्रशेखर डांगे, हणमंत देवकत्ते यांच्यासह सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना बसवराज पाटील मुरूमकर यांनी कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. नवनिर्वाचित नगरसेविका उषा देवकत्ते यांनीही पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरून प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis