
सोलापूर, 08 एप्रिल, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील शैक्षणिक स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला.
या बैठकीत जिल्ह्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची उपलब्धता, तसेच शाळांमधील पायाभूत सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले.
गेल्या काही काळात प्रलंबित राहिलेली शैक्षणिक कामे त्वरित पूर्ण करावीत, डिजिटल शिक्षणाला चालना द्यावी तसेच शाळांमध्ये स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा आणि जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख, माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप, शिक्षण अधिकारी सुलभा वठारे मॅडम व सर्व तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड