सोलापूर - ऊस बिले तात्काळ द्या; रयत क्रांती संघटनेचा इशारा
सोलापूर, 08 एप्रिल, (हिं.स.) : २०२५-२०२६ या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले तात्काळ अदा करण्यात यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत रयत क्रांती संघटनेच्या वतीने साखर संचालकांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष न
Hfh


सोलापूर, 08 एप्रिल, (हिं.स.) : २०२५-२०२६ या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले तात्काळ अदा करण्यात यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत रयत क्रांती संघटनेच्या वतीने साखर संचालकांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना वेळेत ऊस पुरवठा करूनही बिले मिळण्यात मोठा विलंब होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतीचा खर्च, मजुरी, खत-औषधे, वीजबिले तसेच कुटुंबीयांचा उदरनिर्वाह या सर्व जबाबदाऱ्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, ऊस बिलांची रक्कम मिळणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.

संघटनेच्या वतीने साखर कारखानदारांनी शासनाच्या नियमांनुसार वेळेत बिले अदा करावीत, तसेच थकीत रकमेवर व्याजासह देयके देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या काळात आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

या वेळी प्रदेशाध्यक्ष दीपकजी भोसले, प्रा. सुहास पाटील, दिगंबर बाबा ननवरे, लक्ष्मण बिराजदार, अमोल वेदपाठक, राहुल पवार, रमेश भांगे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande