बारामती पोटनिवडणूक - काॅंग्रेससह 30 उमेदवारांनी घेतले अर्ज माघारी, 23 जण रिंगणात
- अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांचा अर्ज कायम पुणे, 09 एप्रिल (हिं.स.)।बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्ज माघारी घेत असल्याची घोषणा केली. यावे
Voter


- अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांचा अर्ज कायम

पुणे, 09 एप्रिल (हिं.स.)।बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्ज माघारी घेत असल्याची घोषणा केली. यावेळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन करुन विनंती केल्याची तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील सकाळी सकाळीच भेट घेतल्याची माहिती दिली. तसेच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील सूचना केल्याचं उल्लेख करत सपकाळ यांनी काँग्रेसने निवडणुकीत माघार घेतल्याचं सांगितलं.

बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेण्याची वेळ संपली आहे. तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे, बारामती विधानसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या 53 पैकी एकूण 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे- शर्मा यांचा अर्ज कायम आहेत. त्यामुळे, बारामती पोटनिवडणुकी एकूण 23 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, गुरुवारी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते, त्यानंतर आज 24 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे, एकूण, 30 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तसेच करुणा शर्मा यांनी देखील अर्ज भरला होता. त्यामुळे, काँग्रेसने माघार घेतल्यानंतर या दोघांच्या अर्जाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघेही बारामतीत फिरकलेच नाहीत. त्यामुळे, त्यांचे अर्ज कायम राहिले असून आता, पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचं निश्चित झालं आहे. बारामतीत 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande