चुकीचे व नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कारवाई होणारच - सीईओ पवार
नाशिक, 09 एप्रिल, (हिं.स.)। जिल्हा परिषदेत गत महिन्याभरात एसीबीचे ३ ट्रॅप झाल्याने झेडपीच्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याची अतिशय गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी घेतली असून चुकीचे आणि बेकायदेशीर काम करणाऱ्
चुकीचे व नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कारवाई होणारच - सीईओ पवार


नाशिक, 09 एप्रिल, (हिं.स.)। जिल्हा परिषदेत गत महिन्याभरात एसीबीचे ३ ट्रॅप झाल्याने झेडपीच्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याची अतिशय गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी घेतली असून चुकीचे आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही अशी सक्त ताकीद त्यांनी प्रशासनाला दिली आहे.

गत महिन्याभरात जिल्हा परिषदेत एसीबीने ३ सापळे रचत लाच स्विकारणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पकडले. दिंडोरी पंचायत समिती आणि प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना पकडल्यानंतर यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले की, याबाबत चिंता व्यक्त करतांना चुकीचे आणि बेकायेदशीर कामे करणाऱ्या एकाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांला सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. लाच मागणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याबाबत प्रशासन अतिशय गंभीर असून अशा कर्मचाऱ्याच्याविरोधात कठोरात कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सदर अधिकारी, कर्मचाऱ्याची दफ्तर तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande