उद्योजक यतीन शहा यांच्याकडून नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत
सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.)।सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. हे एक अभ्यासू, जमिनीवर काम करणारे आणि रिझल्ट देणारे अधिकारी आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा सोलापूरच्या विकासाला निश्चितच होईल, अशा शब्दांत प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडचे (PCL) प्
hgf


सोलापूर, 09 एप्रिल (हिं.स.)।सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. हे एक अभ्यासू, जमिनीवर काम करणारे आणि रिझल्ट देणारे अधिकारी आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा सोलापूरच्या विकासाला निश्चितच होईल, अशा शब्दांत प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडचे (PCL) प्रमुख यतीन शहा यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर यतीन शहा यांनी कार्तिकेयन एस. यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीबद्दल अत्यंत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. यतीन शहा यांनी कार्तिकेयन एस. यांच्या प्रशासकीय अनुभवाचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांच्याकडे विविध क्षेत्रांतील कामाचा दांडगा अनुभव आहे: पायाभूत सुविधा, महसूल आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांचा अनुभव असलेला अधिकारी सोलापूरसारख्या आव्हानात्मक जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि काम करण्याची वृत्ती पाहता, सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल. ही फक्त बदली नसून सोलापूरसाठी बदल घडवण्याची सुरुवात आहे, असेही त्यांनी नमूद केले. ---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande