पुणे - यावर्षीचा महामानव डॉ. आंबेडकर जयंती उत्सव ठरणार संस्मरणीय : परशुराम वाडेकर
पुणे, 09 एप्रिल, (हिं.स.)। या वर्षी साजऱ्या होणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी महापालिकेच्य वतीने अध्ययवत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून यावर्षीच्या जयंती उत्सव संस्मरणीय ठरेल, अशी ग्वाही उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पत्
पुणे - यावर्षीचा महामानव डॉ. आंबेडकर जयंती उत्सव ठरणार संस्मरणीय : परशुराम वाडेकर


पुणे, 09 एप्रिल, (हिं.स.)। या वर्षी साजऱ्या होणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी महापालिकेच्य वतीने अध्ययवत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून यावर्षीच्या जयंती उत्सव संस्मरणीय ठरेल, अशी ग्वाही उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जयंती उत्सवाच्या तयारीचा प्रत्यक्ष आढावा पत्रकारांनाही घेता यावा यासाठी आंबेडकर पुतळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला उपमहापौरांसह स्थानिक नगरसेवक नीलेश आल्हाट, मनपा उपायुक्त परिमंडळ १ माधव जगताप, उपअभियंता बाळासाहेब पंडित, विठ्ठल गायकवाड, राहुल डंबाळे उपस्थित होते.

या वर्षी महापालिका प्रथमच अनेक प्रकारच्या सुविधा नव्याने उपलब्ध करून देणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा. आंबेडकर पुतळा, मंगळवार पेठेतील आंबेडकर भवन आणि कॅम्प परिसरातील आंबेडकर पुतळा या पूर्ण मार्गावर मंडपाचे आच्छादन घालण्यात येणार आहे, अशी माहिती उपमहापौरांनी दिली.

भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडपावर पाण्याची फवारणी, मंडपात हवा थंड ठेवण्यासाठी तसेच पिण्याच्या थंड पाण्यासाठी कुलरची व्यवस्थ करण्यात येणार आहे. या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या मर्यादित असल्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या बसमधील फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा जयंती उत्सव काळात उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही वाडेकर यांनी सांगितले.

आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा प्रसार करणारी पुस्तके नागरिकांना पाहता यावीत व विकत घेता यावी यासाठी फोटोझिंकोच्या गल्लीत पुस्तकांच्या स्टॉल्ससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार जयंती उत्सव काळात संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे, असेही वाडेकर यांनी स्पष्ट केले.

यावर्षीचा जयंती उत्सव अधिक देखणा, सुविधायुक्त आणि संस्मरणीय करण्यासाठी त्याच्या नियोजनाची जबाबदारी महापौर आणि आयुक्तांनी विश्वासाने आपल्यावर सोपवली असून त्यासाठी सर्व नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त होत आहे, असेही वाडेकर यांनी नमूद केले.

यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जन्मद्वीशताब्दी वर्षाचा प्रारंभ, चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष अशा अनेक प्रेरणादायी क्षणांचे स्मरण करून देणारे वर्ष असल्याने महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील सर्व पुतळ्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल केली जावी या दृष्टीने ही निर्णय घेतले जाणार आहेत, असेही वाडेकर यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी ज्या ज्या ठिकाणी जयंती उत्सव साजरा केला जात असेल त्या त्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून त्या ठिकाणच्या सुविधा आणि स्वच्छता याचे नियोजन करणार आहेत. पोलिसांच्या सहकार्याने या काळात काही मार्गात बदल करून वाहतुकीचेही योग्य नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त जगताप यांनी दिली. जयंती उत्सवाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आणि अग्निशामक दल देखील तैनात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

*कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या*

आंबेडकर जयंती अथवा अन्य कोणत्याही महापुरुषांची संबंधित सण उत्सवाच्या वेळी वेळेच्या अथवा आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघनाशी संबंधित कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेतले जावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली असून त्याला निश्चितपणे सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

*सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता आठवड्यातून एकदा होणार*

शहरात विविध महापुरुषांचे पुतळे आहेत मात्र त्यांची योग्य देखभाल हॉट नसल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची आठवड्यातून एकदा स्वच्छता करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिल्याचेही उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande