डबलडेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार : उपमुख्यमंत्री शिंदे
ठाणे, 01 मे (हिं.स.)। : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकुलित डबलडेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून या बसचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या डबलडेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी ह
ठाणे


ठाणे


ठाणे, 01 मे (हिं.स.)। : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकुलित डबलडेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून या बसचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या डबलडेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असून ही बस आपली स्वत:ची आहे असे समजून तिची काळजी घ्यावी असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले

यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका काजल गुणीजन, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मधूकर बोडके, डॉ. मिताली संचेती, दिपक झिंजाड, जितेंद्र निकम, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास डबलडेकर बसमधून केला. जी.सी.सी तत्वावर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही. या डबलडेकर बसमध्ये एकाचवेळी 65 प्रवासी आसनस्थ होवून प्रवास करु शकणार आहे, तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करु शकतील.

सद्यस्थितीत ही बस तीन हात नाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून ठाणेकरांना या बसमधून पर्यटनाचा आनंद लुटता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. परिवहन ताफ्यात आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार असल्याचेही पर‍िवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande