
सोलापूर, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे, पुणे येथील भक्ताने सेवा अर्पण केली आहे. आज महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशा विविध रंगबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त आज पुणे येथील भाविकांनी ही फुलांची सेवा अर्पण केली आहे.
या सजावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक आणि आकर्षक दिसत आहे.सजावटीसाठी शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब, रॉकेट, ब्लू डीजी अशा देशी विदेशी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त युवराज सोनार, विजय सोनार, दादासाहेब पोकळे आणि सचिन चव्हाण यांच्याकडून ही फुलांची सेवा विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड