मप्र जबलपूर येथे बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पीएमएनआरएफमधून मदतीची केली घोषणा नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुःखद दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्यांच्याप्रति पंतप्रधान
PM Expresses Grief Loss Life Due Boat Capsizing Jabalpur MP


पीएमएनआरएफमधून मदतीची केली घोषणा

नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुःखद दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्यांच्याप्रति पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली. स्थानिक प्रशासन पीडितांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे, असेही ते म्हणाले.

या दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) 2 लाख रुपये तर आणि जखमींना 50,000 रुपये दिले जातील, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले की, मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बोट उलटल्याने झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. या दुःखद दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्यांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकराल लवकर सुधारणा होऊ देत अशी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे.

मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande