
पुणे, 01 मे (हिं.स.)।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील प्रांगणात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ) प्रफुल्ल पवार यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, अधिष्ठाता, विद्यापीठाचे सर्व संविधानिक अधिकारी, विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु