सोलापूर - महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट; महागाई भत्त्यात ३% वाढ
सोलापूर, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि महापालिका स्थापना दिनाचे औचित्य साधत सोलापूर महानगरपालिकेत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहराच्या विकासात म
grdsfg


सोलापूर, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि महापालिका स्थापना दिनाचे औचित्य साधत सोलापूर महानगरपालिकेत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

याच वेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जाहीर करत महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन उंबासे, संदीप कारंजे तसेच महापालिकेतील नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या भाषणात कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत सांगितले की, “महापालिकेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून, त्यांच्या कल्याणासाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे.”महापालिका स्थापना दिन, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या तिन्ही महत्त्वाच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी विशेष ठरला असून, त्यांना नव्या उर्जेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande